मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
ज्ञानाचा सागर । सखा माझा ...

संत जनाबाई - ज्ञानाचा सागर । सखा माझा ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


ज्ञानाचा सागर । सखा माझा ज्ञानेश्वर ॥१॥

मरोनियां जावें । बा माझ्याच्या पोटा यावें ॥२॥

ऐसें करी माझ्या भावा । सख्या माझ्या ज्ञानदेवा ॥३॥

जावें वोवाळुनी । जन्मोजन्मीं दासी जनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP