मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
संतमहानुभाव येती दिगंबर ।...

संत जनाबाई - संतमहानुभाव येती दिगंबर ।...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


संतमहानुभाव येती दिगंबर । नम्रतेचें घर विरळा जाणें ॥१॥

निवाले मीपण तें जें ठायीं नाहीं । सोहं शब्द सोई तेथें कैंची ॥२॥

पाहतां हा कोण दावितां हा कोण । पाहतां दावितां हे खूण विरळा जाणें ॥३॥

नामयाची जनी वस्तु झाली । अवघ्यांसी बुडाली परब्रह्मीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP