मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
पतंग सुखावला भारी । उडी घ...

संत जनाबाई - पतंग सुखावला भारी । उडी घ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


पतंग सुखावला भारी । उडी घाली दीपावरी ॥१॥

परि तो देहांतीं मुकला । दोहीं पदार्थी नाडिला ॥२॥

विषयांचे संगती । बहु गेले अधोगती ॥३॥

ऐसे विषयानें भुलविले । जनी म्हणे वांयां गेले ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP