मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
दळितां कांडितां । तुज गाई...

संत जनाबाई - दळितां कांडितां । तुज गाई...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


दळितां कांडितां । तुज गाईन अनंता ॥१॥

न विसंबें क्षणभरी । तुझें नाम गा मुरारी ॥२॥

नित्य हाचि कारभार । मुखीं हरि निरंतर ॥३॥

मायबाप बंधुबहिणी । तूं बा सखा चक्रपाणी ॥४॥

लक्ष लागलें चरणासी । म्हणे नामयाची दासी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP