मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
देव खाते देव पीते । देवाव...

संत जनाबाई - देव खाते देव पीते । देवाव...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


देव खाते देव पीते । देवावरी मी निजतें ॥१॥

देव देते देव घेते । देवासवें व्यवहारिते ॥२॥

देव येथें देव तेथे । देवाविणें नाहीं रीतें ॥३॥

जनी म्हणे विठाबाई । भरुनि उरलें अंतरबाहीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP