मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
अंगीं हो पैं शांती । दया ...

संत जनाबाई - अंगीं हो पैं शांती । दया ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


अंगीं हो पैं शांती । दया क्षमा सर्वांभूतीं ॥१॥

जेथें जाऊन पाहे देवा । ब्रह्मादिक करिती सेवा ॥२॥

आवडी असे पैं कीर्तनीं । लवे संतांचे चरणीं ॥३॥

जैसी दया पुत्रावरी । तेंचि पाहे चराचरीं ॥४॥

बहु अपराध केला । म्हणे जनी तो रक्षिला ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP