मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
मना लागीं हाचि धंदा । राम...

संत जनाबाई - मना लागीं हाचि धंदा । राम...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


मना लागीं हाचि धंदा । रामकृष्ण हरि गोविंदा ॥१॥

जिव्हे करुं नित्य नेम । सदा विठोबाचें नाम ॥२॥

नामामध्यें नामसार । जप करी निरंतर ॥३॥

म्हणे जनी नाम घेणें । नाममंत्रें शंकर होणें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP