मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
जोड झालीरे शिवासी । भ्रा...

संत जनाबाई - जोड झालीरे शिवासी । भ्रा...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


जोड झालीरे शिवासी । भ्रांत फिटली जिवाची ॥१॥

आनंदची आनंदाला । आनंद बोधचि बोधला ॥२॥

आनंदाची लहरी उठी । ब्रह्मानंद गिळिला पोटीं ॥३॥

एक पण जेथें पाहीं । तेथें विज्ञाप्ति उरली नाहीं ॥४॥

ऐसी सदुरुची करणी । दासी जनी विठ्‌ठल चरणीं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP