मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
धरिला पंढरीचा चोर । गळां ...

संत जनाबाई - धरिला पंढरीचा चोर । गळां ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


धरिला पंढरीचा चोर । गळां बांधोनिया दोर ॥१॥

ह्रुदय बंदिखाना केला । आंत विठ्‌ठल कोंडिला ॥२॥

शब्दें केली जडाजुडी । विठ्‌ठल पायीं घातली बेडी ॥३॥

सोहं शब्दाचा मारा केला । विठ्‌ठल काकुलती आला ॥४॥

जनी म्हणे बा विठ्‌ठला । जीवें न सोडीं मी तुला ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP