मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
माझे मनीं जें जें होतें ।...

संत जनाबाई - माझे मनीं जें जें होतें ।...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


माझे मनीं जें जें होतें । तें तें दिधलें अनंतें ॥१॥

देह नेउनी विदेही केलें । शांति देउनी मीपण नेलें ॥२॥

मूळ नेलें हें क्रोधाचें । ठाणें केलें विवेकाचें ॥३॥

निज पदीं दिधला ठाव । जनी म्हणे दाता देव ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP