मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
नाना व्रत तप दान । मुखीं ...

संत जनाबाई - नाना व्रत तप दान । मुखीं ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


नाना व्रत तप दान । मुखीं हरी स्मरण ॥१॥

येथें असों द्यावा भाव । पुरवी अंतरींचें देव ॥२॥

हाचि विश्वास धरुनी । कृपा करील चक्रपाणी ॥३॥

भक्तिभाव ज्याचा पुरा । त्यासी धांवतो सामोरा ॥४॥

लक्ष लावा पायांपाशीं । म्हणे नामयाची दासी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP