मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
कीर्तनाचा रस आवडे नरासी ।...

संत जनाबाई - कीर्तनाचा रस आवडे नरासी ।...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


कीर्तनाचा रस आवडे नरासी । लागती पायांसी मुक्ति चार्‍ही ॥१॥

वारी पंढरीचा निश्चयें म्यां केला । वारकरी झाला पंढरीचा ॥२॥

मोक्षाचा जो मोक्ष मुक्तीची जे मुक्ती । जनी म्हणे किती सांगुं फार ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP