मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
भृंगीचिया अंगीं कोणतें हो...

संत जनाबाई - भृंगीचिया अंगीं कोणतें हो...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


भृंगीचिया अंगीं कोणतें हो बळ । शरिरें अनाढळ केली आळी ॥१॥

काय तिनें तपमुद्रा धरियेली । ह्मणोनियां झाली भृंगी अंगें ॥२॥

अरे बा शहाणिया तैसा करीं जप । संतयोगें पाप नाहीं होय ॥३॥

नामयाची जनी पिटिती डांगोरा । संदेह न धरा करा पूजा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP