मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
वामसव्य दोहींकडे । देखूं ...

संत जनाबाई - वामसव्य दोहींकडे । देखूं ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


वामसव्य दोहींकडे । देखूं कृष्णाचें रुपडें ॥१॥

आतां खाले पाहूं जरी । चहूंकडे दिसे हरी ॥२॥

चराचरीं जें जें दिसे । तें तें अविद्याची नासे ॥३॥

माझें नाठवे मीपण । तेथें कैंचें दुजेपण ॥४॥

सर्वांठायीं पूर्ण कळा । दासी जनी पाहे डोळां ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP