मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
डोईचा पदर आला खांद्यावरी ...

संत जनाबाई - डोईचा पदर आला खांद्यावरी ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


डोईचा पदर आला खांद्यावरी । भरल्या बाजारीं जाईन मी ॥१॥

हातीं घेईन टाळ खांद्यावरी वीणा । आतां मज मना कोण करी ॥२॥

पंढरीच्या पेठे मांडियेले पाल । मनगटावर तेल घाला तुह्मी ॥३॥

जनी म्हणे देवा मी झालें येसवा । निघालें केशवा घर तुझें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP