मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
नित्य सारुं हरीकथा । तेथे...

संत जनाबाई - नित्य सारुं हरीकथा । तेथे...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


नित्य सारुं हरीकथा । तेथें काळ काय आतां ॥१॥

वनवासी कां धाडिलें । कृपाळें बा हो विठ्‌ठलें ॥२॥

आशा मनशा तृषा तिन्ही । ह्या तो ठेविल्या बांधोनि ॥३॥

काम क्रोध विषय झाले । हे तों मोहोनि राहिले ॥४॥

अवलोकूनि कृपा दृष्‍टि । जनी म्हणे देंई भेटी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP