मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
काळाचिये लेख । नाहीं ब्रह...

संत जनाबाई - काळाचिये लेख । नाहीं ब्रह...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


काळाचिये लेख । नाहीं ब्रह्माविष्णु मुख्य ॥१॥

युगा एक लव झडे । तोही न सरे काळापुढें ॥२॥

अविद्येनें नवल केलें । मिथ्या देह सत्य केलें ॥३॥

महीपाळ स्वर्गपाळ । तेही ग्रासले समूळ ॥४॥

वर्म चुकलीं बापुडीं । दासी जनी विठ्‌ठल जोडी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP