मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
वैकुंठीचा हरी । तान्हा यश...

संत जनाबाई - वैकुंठीचा हरी । तान्हा यश...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


वैकुंठीचा हरी । तान्हा यशोदेच्या घरीं ॥१॥

रांगतसे हा अंगणीं । माथा जावळाची वेणी ॥२॥

पायीं पैंजण आणि वाळे । हातीं नवनीताचे गोळे ॥३॥

धन्य यशोदा ते माय । दासी जनी वंदी पाय ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP