मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
ज्योत पहा झमकली । काय सां...

संत जनाबाई - ज्योत पहा झमकली । काय सां...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


ज्योत पहा झमकली । काय सांगूं त्याची बोली ॥१॥

प्रवृत्ति निवृत्ति दोघीजणी । लीन होती त्याच्या चरणीं ॥२॥

परापश्यंती मध्यमा । वैखरेची झाली सीमा ॥३॥

चारी वाचा कुंठित जाहाली । सोहं ज्योत प्रकाशली ॥४॥

ज्योत परब्रह्मीं जाणा । जनी म्हणे निरंजना ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP