मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
भ्रांती माझें मन प्रपंचीं...

संत जनाबाई - भ्रांती माझें मन प्रपंचीं...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


भ्रांती माझें मन प्रपंचीं गुंतलें । श्रवण मनन होउनी ठेलें ॥१॥

बापें बोधिलें बापें बोधिली । बोधुनी कैसी तद्रुप झाली ॥२॥

निज्रध्यासें कैसा अवघाचि सांपडला । कीं विश्वरुपीं देखिला बाईयांनो ॥३॥

नामयाची जनी स्वयंबोध झाला । अवघाचि पुसिला ठाव देखा ॥४॥


References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP