मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
नम्रतेविण योग्यता मिरविती...

संत जनाबाई - नम्रतेविण योग्यता मिरविती...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


नम्रतेविण योग्यता मिरविती । ते केवीं पावती ब्रह्मसुख ॥१॥

लटिकें नेत्र लावूनि ध्यान पैं करिती । ते केवीं पावती केशवातें ॥२॥

एक संत म्हणविती नग्न पैं हिंडती । अंतरींची स्थिति खडबड ॥३॥

झालेपणाचे गुण दिसताती सगुण । वस्तु ते आपण होऊनि ठेली ॥४॥

सागरीं गंगा मिळोनि गेली जैसी । परतोनि तियेसी नाम नाहीं ॥५॥

नामयाची जनी निर्गुणीं बोधिली । ठेवा जो लाधली पांडुरंग ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP