मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
चला पंढरीसी जाऊं । रखुमाद...

संत जनाबाई - चला पंढरीसी जाऊं । रखुमाद...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


चला पंढरीसी जाऊं । रखुमादेवीवर पाहूं ॥१॥

स्नान करुं भिवरेसी । पुंडलिका पायांपाशीं ॥२॥

डोळे भरून पाहूं देवा । तेणें ईश्वर जीवाभावा ॥३॥

ऐसा निश्चय करुनी । म्हणे नामयाची जनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP