मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
आतां येतों स्वामी आम्ही ।...

संत जनाबाई - आतां येतों स्वामी आम्ही ।...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


आतां येतों स्वामी आम्ही । कृपा असों द्यावी तुह्मी ॥१॥

बहु दिवस सांभाळ केला । पुन्हा जन्म नाहीं दिला ॥२॥

थोर सुकृताच्या राशी । तुमचे पाय मजपाशीं ॥३॥

ऐसा नामदेव बोले । ऐकोनी दासी जनी डोले ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP