मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
करूं हरीचें कीर्तन । गाऊं...

संत जनाबाई - करूं हरीचें कीर्तन । गाऊं...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


करूं हरीचें कीर्तन । गाऊं निर्मळ ते गुण ॥१॥

सदा धरुं संतसंग । मुखीं ह्मणूं पांडुरंग ॥२॥

करुं जनावरी कृपा । रामनाम म्हणवूं लोकां ॥३॥

जनी म्हणे कीर्ति करुं । नाम बळकट धरुं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP