मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
येऊनियां जन्मा एक । करा द...

संत जनाबाई - येऊनियां जन्मा एक । करा द...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


येऊनियां जन्मा एक । करा देहाचें सार्थक ॥१॥

वाचे नाम विठ्‌ठलाचें । तेणें सार्थक जन्माचें ॥२॥

ऐसा नामाचा महिमा । शेष वर्णितां झाली सीमा ॥३॥

नाम शास्त्रीं त्रिभुवनीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP