मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
आतां भीत नाहीं देवा । आदि...

संत जनाबाई - आतां भीत नाहीं देवा । आदि...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


आतां भीत नाहीं देवा । आदि अंत तुझा ठावा ॥१॥

झालें नामाचेनि बळकट । तेणें वैकुंठ पायवाट ॥२॥

ज्ञान वैराग्य विवेक बळें । तें तंव अह्मांसवें खेळे ॥३॥

दया क्षमा आम्हांपुढें । जनी म्हणे झाले वेडे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP