मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध २|
तीर्थात अस्थि टाकण्याचा विधि

धर्मसिंधु - तीर्थात अस्थि टाकण्याचा विधि

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


पूर्वी सचैल स्नान करुन जेथें अस्थि पुरुन ठेवल्या असतील ती भूमी निरनिराळ्या गोमूत्रादिकांनी प्रोक्षण करावी. गायत्रीमंत्रानें गोमूत्रानें प्रोक्षण करावें. ' गंधद्वारा ' या मंत्रानें गोमयाने, ' आप्यायस्व ' या मंत्रानें दुधानें, ' दधिक्रावणो ' मंत्रानें दह्यानें, व ' घृतं मिमिक्षे ' या मंत्रानें घृतानें प्रोक्षण करावें. नंतर '' उपसर्पेति चतस्त्रणांऋचां शंखः पितरः स्तृष्टुव । भूप्रार्थन खनन मृदुद्धरणास्थिगृहणेषु क्रमेण विनियोगः'' या चार ऋचांनी क्रमानें भूमीची प्रार्थना करुन भूमि खणून माती एकीकडे सारुन अस्थि काढून घ्याव्या; व कर्त्यानें जलाशयांत गृह्योक्तविधीनें स्नान करावें. नंतर अस्थींची शुद्धि करावी; ती अशीः-- अस्थींस स्पर्श करुन ' एतोंनविंद्रं. ' या तीन ऋचांचे आवृत्तीनें पंचगव्यानें स्नान करुन स्पर्श करुनच १० स्नानें करावीं. याविषयीं वर सांगितलेल्या गायत्र्यादि पांच मंत्रांनी गोमूत्र, गोमय, दूध, दधि व घृत, यांनीं स्नानें करावीं, व '' देवस्यत्वा '' या मंत्रानें कुशोदकानें, '' मानस्तोके० '' या मंत्रानें भस्मानें, '' अश्वक्रांते० '' या मंत्रानें मृत्तिकेनें, '' मधुवाता '' या मंत्रानें मधानें व '' आपोहिष्ठा '' या मंत्रानें शुद्धोदकानें स्नान करावें. अशीं दहा स्नानें करुन अस्थींवर दर्मानीं मार्जन करावें. मार्जनाविषयी मंत्रः--- ' अतोदेवा ' ही ऋचा, व '' एतोंनविंद्रं० ' शुचि ओ. ३ नतमोहोन ८ इति वा इति० १३ स्वादिष्टया० १० ममाग्नेवर्चो० ९ कद्रुदाय प्र० ९'' हीं सात सूक्तें नंतर ज्याच्या अस्थि असतील त्याचें सपिंडीकरण झालें असल्यास पार्वणविधीनें अस्थिक्षेपांगभूत श्राद्ध हिरण्यानें करावें, व पिठाचे पिंड द्यावे. १० दिवसांचे आंत अस्थि टाकणें असल्यास एकोद्दिष्ट विधीनें श्राद्ध करावें. नंतर तिलतर्पण करुन पुनः पंचगव्य, पंचामृत व शुद्धोदक यांनी अस्थि धुवून यक्षकर्दमांनी लिप्त करुन पुष्पांनी पूजा करावी; व कृष्णाजिन, कंबल, दर्भ, भूर्जपत्र, तागाचे वस्त्र व ताडपत्र यांची क्रमानें ७ वेळ वेष्टनें देऊन तांब्याचे करंड्यांत ठेवाव्या. त्यांत यक्षकर्दमाचें लक्षण सांगतोः--- १२ तोळे चंदन, १२ तोळे केशर, ६ तोळे कापूर व ४ तोळे कस्तुरी हें पदार्थ एकत्र मिळवून केलेला तो यक्ष कर्दम होय. नंतर अस्थींच्या ठायीं सोन्यारुप्याचे तुकडे, मोतीं, पोळीं, नीलमणी ही टाकून आपल्या सूत्रांत सांगितलेल्या विधीनें स्थंडिलावर अग्निस्थापनादि करुन अष्टोत्तर शत तिल व आज्य यांच्या आहुतींनीं होम करावा. '' उदीरतां शंखः पितरस्तृष्टुप । अस्थिप्रक्षेपांग तिलाज्य होमे विनियोगः '' हा मंत्र म्हणून ' उदीरतां ' या सूक्ताच्या १५ ऋचांनीं प्रत्येक ऋचेस १ आहुति याप्रमाणें सूक्ताच्या ७ आवृत्ति करुन व शेष १० आहुति पहिल्या ऋचांच्या आवृत्तीनें याप्रमाणे अष्टोत्तर शत तिलाहुति व अष्टोत्तर शत आज्याहुति होम करावा. वेष्टनासहित अस्थियुक्त तो तांब्याचा करंड घेऊन तीर्थास जावें. त्याविषयी नियमः-- मूत्रपुरीषोत्सर्ग कालीं व आचमन कालीं अस्थि धारण करुं नयेत. अस्थि धारण केल्या असतील तेव्हां शूद्र, यवन, अंत्यज इत्यादिकांस व आपणांहून हीन जाती यांस स्पर्श करुं नये, असें काशीखंडांत आहे. नंतर तीर्थास जाऊन तीर्थ प्राप्त निमित्तक स्नानादिक करुन अस्थींस स्नान घालावें; व '' अमुक गोत्रस्यामुक शर्मणो ब्रह्मलोकादि प्राप्तयेऽमुक तीर्थये अस्थि प्रक्षेपमहं करिष्ये '' असा संकल्प करुन पळसाचे द्रोणांत पंचगव्यानें अस्थींस सिंचन करुन सुवर्ण शकलें, पुष्पें, घृत व तिल यांनीं मिश्रित अशा अस्थि मृत्तिकेच्या पिंडांवर ठेवून दक्षिण दिशेस पाहात असतां '' नमोस्तु धर्माय '' असें म्हणून तीर्थात प्रवेश करावा व नाभिप्रमाण उदकांत उभें राहून ' समेप्रीतोस्तु ' असें म्हणून तीर्थात अस्थि टाकाव्या. नंतर स्नान करुन उदकांतून बाहेर येऊन सूर्याचें दर्शन घेऊन हरीचें स्मरण करावें. व '' अमुकस्यास्थि क्षेपः कृततत्सांगतार्थ रजतमिदं तुभ्यं संप्रददे '' असें म्हणून ब्राह्मणास यथाशक्ति रौप्य दक्षिणा द्यावी याप्रमाणे अस्थिं टाकण्याचा प्रकार सांगितला.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP