संक्रांती, युगादि, मन्वादि श्राद्धे किंवा वृद्धिश्राद्धानंतर कर्तव्य जी दर्शादिश्राद्धे त्यात पिंडदानाचा निषेध असल्याने या सर्व श्राद्धात सांकल्पिक विधि करावा. तसेच पिंडदानादि बहुविस्तृत श्राद्ध करण्यास जो समर्थ नसेल त्यानेही सांकल्पिक विधि करावा. तसेच पिंडदानादि बहुविस्तृत श्राद्ध करण्यास जो समर्थ नसेल त्यानेही सांकल्पिक विधि करावा. तो असा
'अमुक श्राद्धं सांकल्पिकविधिनान्नेन हविषा करिष्ये'
असा संकल्प करून तिसरा क्षण देणे येथपर्यंत प्रयोग पूर्विप्रमाणे करावा व अर्घ्यदान आणि समंत्रक आवाहन ही वर्ज्य करावीत.
'देवानावाहयामि, पितृन आवाहयामि'
असेच आवाहन करुन गंधादि उपचारांनी पूजनापासून पिशंगीपर्यंत कर्म झाल्यावर अग्नौकरण वर्ज्य करून परिवेशणापासून संपन्नवचनापर्यंत कर्म करावे. नंतर उत्तरापोशन विकिरव, पिंडदान ही वर्ज्य करून अक्षय्यवाचनापर्यंत कर्म करावे; व 'स्वधावाचयिष्ये स्वधोच्यतां' या वाक्याने रहित असा सर्व प्रयोग पूर्वीप्रमाणे समाप्त करावा. याप्रमाणे सांकल्पिक प्रयोग सांगितला.