असावधपणानें किंवा गर्वादिकांच्या योगानें सर्पापासून मरण प्राप्त झाल्यास अशौचादिक धरुं नये. पुढें सांगण्यांत येणारें नांवपूजाव्रत करुन नारायणबलि, सुवर्णनागाचें दान व प्रत्यक्ष गोदान, हीं करुन, दहन, अशौच इत्यादि करावें. सर्वत्र दुर्मरण व पतितादि मरण असतां तें तें प्रायश्चित्त करुन दहन, अशौच, इत्यादि करावें, असें सांगितलें आहे.