कुत्रा, कोल्हा, गर्दभ, मांजर, उंदीर, चांडाल व पतित इत्यादिकांनी पिंडास स्पर्श केला असता व प्रमादाने पिंड भिन्न झाला असता स्नान करून प्राजापत्य प्रायश्चित्त करावे; व पुनः यथाविधि पिंड द्यावे. दुसर्या पाकाने किंवा त्याच पाकाने पिंडदान मात्र पुनः करावे. सर्व श्राद्धाची आवृत्ति करू नये, हे सर्वसंमत आहे. कावळ्याचा स्पर्श होईल तर दोष नाही.