विघ्नरुप शुष्क तृणास केवल अग्नि असा जो श्रीविठ्ठल त्यास नमस्कार करुन सर्व शाखोपयोगी अंत्येष्टि निर्णय सांगतों:--
अंत्यकर्माचे अधिकारी श्राद्धाचे आरंमींच सांगितले आहेत. सर्वाचा अभाव असल्यास धर्मपुत्र करावा. पिता इत्यादिकांचें मरण समीप आलें असें पाहून पुत्नादिक अधिकार्यांनीं पित्याकडून सार्धाब्द प्रायश्चित्त व मोक्षधेनु इत्यादि दानें करवावी. किंवा त्याच्या उद्देशानें स्वतः करावीं. प्रायश्चित्तप्रयोग प्रायश्चित्तप्रकरणीं पहावा. सामर्थ्य असल्यास प्रायश्चित्त केल्यावर दशदानें करावीं. त्याविषयी मंत्र - ' गवामंगेषुतिष्ठन्ति ' हा गोदानाचा मंत्र, ' सर्वभूताश्रयाभूमिर्वराहेण समुधृता । अनंत सस्य फलदा ह्यतः शांतिं प्रयच्छमे, ' हा भूमिदानाचा मंत्र, ' महर्षेर्गोत्नसंभूता कास्यपस्य तिलास्मृताः । तस्मादेषां प्रदानेन ममपापं व्यपोहतु' हा तिलांचा, ' हिरण्यगर्भगर्भस्थं०' हा सुवर्णाचा; कामधेनुषु संभूतं सर्व ऋतुषु संस्थितं । देवानामाज्यमाहार मतः शांर्ति प्रयच्छमे ०' हा घृताचा; ' शरणं सर्व लोकानां लज्जाया लक्षणं परं । सुवेषधारि वस्त्रत्वं मतः०' या मंत्रानें वस्त्र द्यावे; ' सर्व देवमयं धान्यं सर्वोत्पत्तिकरं महत् । प्राणिनां जीवनोपाथ मतः शांति प्रयच्छमे ' या मंत्रानें धान्याचें दान करावें. ' प्रीतियतः पितृणांच विष्णुशंकर योःसदा । शिवनेत्रोद्भवं रुप्य मतः ०' या मंत्रानें रौप्य दान करावें; ' यस्मादन्नरसाःसर्वेनोत्कृष्टालवणं विना । शंभो प्रीति करं नित्यमतः' या मंत्नानें लवणदान करावें. भूमि इत्यादिकांची प्रमाणें जननशांतिप्रकर्णांत सांगितलीं आहेत. प्रायश्चित्तादि कर्मीत विष्णु इत्यादिकांचे नामसंकीर्तनानें कर्माची सांगता होते. प्रायश्चित्तादिक करणें अशक्य असलें तरी मरणकालीं विष्णु व शिव यांचे नामसंकीर्तन मात्रानें सर्व पापांचा क्षय होऊन मुक्ति प्राप्त होते. असा सर्व पुराणादिकांचा सिद्धांत आहे. तसेंच श्रीभागवतांत अवतार, गुण व कर्म यांचे विडंबन म्हणजे अनुकरण ज्यांचे ठायी आहे अशी ज्या परमेश्वराची नामें प्राणोत्क्रमणकालीं पराधीन असतांही जे उच्चारितात ते अनेकजन्मार्जित पातकें एकाएकीं टाकून अज, निरुपाधी व सत्य अशा ब्रह्माप्रत पावतात. त्या परमेश्वरास मी शरण जातों. इत्यादि. ज्याचें मरण जवळ आलें आहे अशा पित्याकडून जर पुत्र दान देववील तर तें दान गयाश्राद्ध व १०० अश्वमेध यांहून अधिक होतें. ती दानें हीः-- तिलपात्रदान, ऋणधेनु, मोक्षधेनु, पापधेनु, वैतरणीं धेनु, उत्क्रांतिधेनु, इत्यादि दानें करावींत, मृत्यु प्राप्त होतो त्या कालीम व्यतिपात, सूर्यसंक्रांती, तसेंच सूर्यग्रहण व दुसरे इतर पुण्यकाल असतात. ज्याचा मृत्यु जवळ आला त्यानें पूर्वी सांगितल्याप्रमाणें सवत्स गाय द्यावी. सवत्सगाय नसेल तर नरकोद्धार होण्यासाठीं केवल गायच द्यावी. शुक्लपक्ष, दिवसा, भूमि, गंगा, उत्तरायण यांचे ठायीं व हदयस्थ जनार्दन असतां जे मरतील ते धन्य होत, इत्यादि वचन आहे. मुमुक्षूम दानादिक करण्यास सामर्थ्य नसल्यास पुत्रादिकानें द्यावी.