मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध २|
रोदन केल्यास अशौच

धर्मसिंधु - रोदन केल्यास अशौच

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


रोदन केल्यास अशौच- ब्राह्मणादिकांनी आपल्या सवर्णातील मृताविषयी अस्थिसंचयनापूर्वी रोदन केल्यास स्नान. त्यानंतर रोदन केल्यास आचमन करावे. शूद्राविषयी अस्थिसंचयनापूर्वी रोदन करणार्‍या ब्राह्मणास त्रिरात्र, अस्थिसंचयनानंतर १ रात्र अशौच. शूद्राविषयी अस्थिसंचयनापूर्वी त्याच्या घरी राहणे इत्यादि संबंध असता १ रात्र. त्यानंतर स्नान करावे. सपिंडांनी अनुगमन व रोदन केल्यास दोष नाही. या अशौचातही कर्मलोप नाही. येथे सर्वत्र ज्यास जितका अशौचकाल सांगितला तितका पाळल्यावर स्नानानेच तो शुद्ध होतो. स्नान केल्यावाचून तितका काल मात्र घालविल्याने शुद्धि होत नाही. अंत्यकर्म करणाराने अस्थिसंचयनापूर्वी स्त्रीसंग केल्यास चांद्रायण व अस्थिसंचयनानंतर तीन प्राजापत्ये प्रायश्चित्त करावे. अन्यमृताशौचीयांनी अस्थिसंचयनापूर्वी स्त्रीसंग केल्यास त्रिरात्र उपोषण करावे. अस्थिसंचयनानंतर १ रात्र उपोषण करावे.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP