मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध २|
श्राद्धदिवशी वैश्वदेवाचा निर्णय

धर्मसिंधु - श्राद्धदिवशी वैश्वदेवाचा निर्णय

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


श्रोताग्नीनी युक्त असलेल्या सर्व ऋग्वेदी यांनी निराळा पाक करून श्राद्धाच्या पूर्वी वैश्वदेव करावा. स्मार्ताग्नींनी युक्त व निरग्निक अशा ऋग्वेदी यांनी श्राद्धाच्या शेवटीच श्राद्धशेषाने अथवा पृथक्‌ पाकाने वैश्वदेव करावा. स्मार्ताग्नि व श्रोताग्नि यांनी युक्त असलेल्या कात्यायनांनी श्राद्धाच्या पाकाने श्राद्धाच्या पूर्वीच वैश्वदेव करावा. निराग्निक कात्यायनांनी श्राद्धाच्या शेवटी श्राद्धशेषाने किंवा पृथक्‌ पाकाने साग्निक अशा, तैत्तिरीय शाखीयांनी सदा श्राद्धाच्या पूर्वी वैश्वदेव करावा. पण पंचमहायज्ञ श्राद्धाच्या अंती करावे. इतरांनी आरंभी किंवा अंती करावे, असा विकल्प आहे. पण तैतिरीयशाखीयांचेच पंचमहायज्ञ वैश्वदेवाहून निराळेच आहेत. वृद्धिश्राद्ध पाकाने कर्तव्य असता सर्व शाखी यांनी अगोदरच वैश्वदेव करावा. ऋग्वेदीयांनी आदि किंवा अंती करावा. आमान्न इत्यादिकाने वृद्धिश्राद्ध करणे असेल तर सर्वांनी आदि किंवा अंती करावा असे वाटते. नित्य श्राद्धात पूर्वीच करावा. एकादशादिक एकाद्दिष्ट श्राद्धात साग्निक निरग्निक अशा सर्वांनी ब्राह्मणाच्या हवाली करून दुसर्‍या पाकाने वैश्वदेवादिक करावे.

N/A

References : N/A
Last Updated : March 02, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP