मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध २|
अतिक्रांताशौच

धर्मसिंधु - अतिक्रांताशौच

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


जननाशौचात अतिक्रांत अशौच नाही. पित्यास स्नान मात्र ते जननाशौचातही आहे.मृताशौचातही उपनयन न झालेल्याचे मरण इत्यादि निमित्त असल्यास त्रिरात्र, एक रात्र व परगोत्रातील मातुलादिकांच्या मरणनिमित्तक जी पक्षिणी, याविषयी व त्रिरात्रादिक शौचाविषयी अतिक्रांत अशौच नाही. मातापितर मृत असता विवाहित कन्येस त्रिरात्र अशौच. ते अतिक्रांत असले तरी १० दिवसांचे आत त्रिरात्र अशौच आहेच. १० दिवसांनंतर वर्षांतीही पक्षिणी असे सांगितले आहे. याप्रमाणे सोदकादि विषयक जी त्रिरात्रादिक त्यांचेविषयीही अतिक्रांत अशौच नाही; तरी कालांतर असताही स्नानमात्र आहेच. १० दिवसादिक जे मृताशौच तद्विषयक अतिक्रांत अशौच धरावे. दहा दिवसादि अशौचे व त्रिरात्रादिक अशौचे यांचे त्या त्या अशौचात ज्ञान झाल्यास अविशिष्ट दिवसांनी शुद्धि जाणावी. त्रिरात्रादिक अशौचे यांचे त्या त्या अशौचात ज्ञान झाल्यास अविशिष्ट दिवसांनी शुद्धि जाणावी. त्रिरात्रादिक अशौचानंतर १० दिवसाहून कमी अशौचाचे १० दिवसात ज्ञान झाल्यास अतिक्रांत अशौच नाही. स्नान मात्र करावे. मातापितर मरण पावल्याचे दूर देशी असताही व दुसर्‍या वर्षानंतरही श्रुत झाल्यास समजल्या दिवसापासून पुत्रास १० दिवसादि संपूर्ण अशौच आहे. सप्त्नीचे परस्परांस देशकाल यांच्या अपेक्षेवाचून १० दिवसच अशौच आहे. सापत्न माता मृत झाल्यास पुत्रास १० दिवसानंतर देशकालाच्या अपेक्षेवाचून त्रिरात्र अशौच. औरसपुत्र मरण पावल्यास मातापितरांस दुसर्‍या वर्षीही त्रिरात्र अशौच. दहा दिवसानंतर एक देशी सपिंडाचे मरण समजल्यास तीन मासपर्यंत त्रिरात्र, सहा मासापर्यंत पक्षिणी; ९ मासापर्यंत एक रात्र; ९ मासानंतर १ वर्षेपर्यंत सज्जाति किंवा स्नानमात्र करावे. माधवाच्या मताने पक्षत्रयपर्यंत त्रिरात्र; सहामासपर्यंत पक्षिणी, वर्षपर्यंत १ रात्र व वर्षानंतर स्नान मात्र. आपत्ति व अनापत्ति यांचा विचार करून या दोन्ही मतांची व्यवस्था लावावी.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP