मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध २|
वैतरणी गोदानाचा विधि.

धर्मसिंधु - वैतरणी गोदानाचा विधि.

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


' अद्येत्यादि० अमुकस्य यमद्वारस्थित वैतरण्याख्यनद्युत्तारणार्थ गोदानं करिष्ये ' असा संकल्प करुन ब्राह्मणाची पादप्रक्षालन, वस्त्र, गंधमाल्य, इत्यादि उपचारांनी पूजा करावी व ब्राह्मणाचे हातावर ' शिवाआपः संतु सौमन्यस्य मस्तु अक्षतं चारिंष्ट चास्तु यच्छ्रें यस्तदस्तु यत्पापं तत्प्रतिहत मस्तु ' असें करुन ' धेनुकेत्वं प्रतीक्षस्य यमद्वारे महापथे । उत्तितीर्षुरहं देवि वैतरण्यं नमोस्तुते ' या मंत्रानें धेनूची प्रार्थना करावी; '' विष्णुरुप द्विजश्रेष्ठ भूदेव द्विज पावन तर्तुवैतरणीमेतां कृष्णांगांप्रददाम्यहम् '' या मंत्रानें ब्राह्मणाची प्रार्थना करावी. व '' वैतरणी संतारणार्थ इमांगांकृष्णवस्त्र रक्तमाल्याद्यलंकृतां यथाशक्ति दक्षणायुतां तुम्यमहंसंप्रददे । यमद्वारेपथेघोरे घोरावैतरणीनदी । तांतर्तुकामोयच्छामिकृष्णां वैतरणीतुगाम् ॥ नमम '' असे मंत्र म्हणून ब्राह्मणाचे हातावर उदक घालावे. कृष्णवर्ण गाय न मिळाल्यास अन्यवर्णा द्यावी. गायच न मिळाल्याच द्रव्य द्यावें. दान देणारा पुत्रादिक असेल तर प्रथम मंत्रांत ' उत्तितीर्षुरयं ', दुसर्‍या मंत्रांत ' तर्तुवैतरणीमस्य ' व तिसर्‍या मंत्रांत ' तांतर्तुमस्य ' असें म्हणावें.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP