मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध २|
क्षय दिवसाचे अज्ञान असल्यास

धर्मसिंधु - क्षय दिवसाचे अज्ञान असल्यास

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


देशांतरी मरण पावल्यामुळे ज्या मृत झालेल्याचा मास माहीत असून तिथि माहीत नसेल तर त्या मासात दर्श, शुक्ल एकादशी किंवा कृष्ण एकादशी यातून कोणत्याही दिवशी त्याचे वार्षिक श्राद्ध करावे. मृततिथि माहीत असून मास माहीत नसेल तर मार्गशीर्ष, माघ किंवा भाद्रपद अथवा आषाढ या मासात त्या तिथीस वार्षिक श्राद्ध करावे. तिथी व मास हे दोन्हीही माहीत नसतील तर ज्या दिवशी देशांतरी प्रस्थान केले तो दिवस व मास घ्यावा. प्रस्थान दिवस माहीत नसेल तर मृत झाल्याची वार्ता ज्या तिथीस ऐकली ती तिथी व तो मास घ्यावा. प्रस्थान व वार्ताश्रवण यांच्या मासाचे ज्ञान व तिथीचे अज्ञान असेल तर त्या मासांत दर्शादि तिथीस वार्षिक श्राद्ध करावे. प्रस्थानादि मासाचे विस्मरण असून तिथींचे स्मरण असेल तर मार्गशीर्षादि सांगितलेल्या चार मासात त्या तिथीस वार्षिक श्राद्ध करावे. मृत वार्ताश्रवण व प्रस्थान यांचा दिवस व मास यांचे अज्ञान असेल तर माघ किंवा मार्गशीर्ष या मासात आमावास्येस वार्षिक श्राद्ध करावे. १२ वर्षे वाट पाहिल्यावर पलाश विधीने दहन केले असता दहन दिवशी वार्षिकादि श्राद्ध करावे.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP