अंगिरस तीन प्रकारचे आहेत
१. गौतमांगिरस १० प्रकारचे आहेत. ते असे १ आयास्य, २ शारद्वत, ३ कौमंड, ४ दिर्घमतस, ५ करेणुपालि, ६ वामदेव, ७ औशनस, ८ राहूगण, ९ सोमराजक आणि १० बृहदुक्थ. यामध्ये
१. आयास्य, श्रोणिवेध, मूढरथ इत्यादि अठरांहून अधिक आयास्य आहेत. त्यांचे आंगिरस, आयास्य, गौतम याप्रमाणे तीन प्रवर आहेत.
२.शारद्वत अभिजित, रौहिण्य इत्यादि सत्तरांहून अधिक शारद्वत आहेत. त्याचे आंगिरस, गौतम, शारद्वत असे तीन प्रवर आहेत.
३. कौमंड, मामंथरेषण, मासुराक्ष इत्यादि दहांहून अधिक कौमंड आहेत. त्यांचे आंगिरस, औतथ्य, काक्षीवत, गौतम व कौमंड असे पाच अथवा आंगिरस. आयास्य, औशिज, गौतम व काक्षीवत असे पाच अथवा आंगिरस, ओशिज, काक्षीवत असे तीन अथवा आंगिरस, औतथ्य, गौतम, कौमंड असे तीन याप्रमाणे प्रवर आहेत.
४. दीर्घतमस. यांचे आंगिरस, औतथ्य, काक्षिवत, गौतम, दैर्घतमस असे पाच अथवा आंगीरस, औतथ्य, दैर्घतमस, असे तीन प्रार आहेत.
५. करेणुपालि, वास्तव्य, श्वेतिय इत्यादि सातांहून अधिक करेणुपालि आहेत त्यांचे आंगिरस, गौतम कारेणुपाल असे तीन प्रवर आहेत.
६. वामदेव. त्यांचे आंगिरस, वामदेव्य, गौतम असे तीन अथवा आंगिरस, वामदेव्य, बार्हदुक्थ असे तीन प्रवर आहेत.
७. औशनस, दिश्य, प्रशस्त इत्यादि नवांहून अधिक औशनस आहेत. त्यांचे आंगिरस, गौतम, औशनस असे तीन प्रवर आहेत.
८. रहूगण. यांचे आंगिरस, राहूगण, गौतम असे तीन प्रवर आहेत.
९. सोमराजक, यांचे आंगिरस, सौमराज्य, गौतम असे तीन प्रवर आहेत.
१०. बूहदुक्थ यांचे आंगिरस, बार्हदुक्थ, गौतम असे तीन प्रवर आहेत.क्वचित ग्रंथामध्ये दोन गण अधिक सांगितले आहेत.
१. उतथ्य. यांचे आंगिरस, औतथ्य, गौतम असे तीन प्रवर आहेत.
२. राघुव. यांचे आंगिरस, राघुव, गौतम असे तीन प्रवर आहेत. सर्व गौतमांचा परस्परांमध्ये विवाह होत नाही. कारण समान गोत्र आहे व दोन अथवा तीन प्रवरांचे साम्य आहे.