दीन, अनाथ याविषयी कृपासागर, भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे जे श्रीमान लक्ष्मीपतीचे चरणकमल त्याचे पुनःपुनः स्मरण करून मी आह्निक आचार सांगतो. पूर्वी सांगितलेला ऋग्वेदी यांचा प्रकार, ज्या ठिकाणी आपल्या सूत्रात सांगितलेल्या विशेषाला बाधक नसेल तेथे यजुर्वेदी यांनी घ्यावा. ब्राह्ममुहूर्ती (रात्रीच्या शेवटच्या प्रहरी) उठून श्रीविष्णूचे स्मरण करून गजेंद्रमोक्ष इत्यादिकांचे पठन करून इष्ट देवतेचे स्मरण करावे.
"समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डिते । विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे"
अशी भूमीची प्रार्थना करून गाय इत्यादि मंगलाचे दर्शन घ्यावे.