नंतर मातामह मृत असून मातेचा पितामह जिवंत असेल तर
"मातामहतत्पितामहप्रपितामहाः"
असा उच्चार करावा. मातेचा प्रपितामह मात्र जिवंत असेल तर
"मातामह मातृपितामहौ मातामहस्य प्रपितामहश्च नान्दीमुखाः"
असा उच्चार करावा. मातेचा पितामह व प्रपितामह दोघेही जिवंत असतील तर
"मातामह मातुः पितामहस्य पितामहप्रपिताहौ च नान्दीमुखाः"
असा उच्चार करावा.