आचमनापासून संकल्पापर्यंत पूर्वीप्रमाणे कर्म करून गायत्रीचे ध्यान करावे. नंतर
"आयातु वरदा देवी अक्षरं ब्रह्मसंमितम् । गायत्रीछन्दसांमातरिदंब्रह्मजुषस्वमे ॥
सर्ववर्णेमहादेविसंध्याविद्येसरस्वति ।
अजरेअमरेदेविसर्वदेविनमोस्तुते ॥
ओजोसि सहोसिबलमासिभ्राजोसि देवानांधामनामासिविश्वमसिविश्वायुःसर्वमसिसर्वायुरभिभूरोमगायत्रीमावाहयामि सावित्रीमावाहयामि सरस्वतीमावाहया० छन्दऋषीनावह० श्रियं० ह्रियमावाहयामि"
या मंत्रांनी संध्येचे आवाहन करून पूर्वीप्रमाणे मार्जन करावे. नंतर
"आपोवाइद सर्वंविश्वाभुतान्यापःप्राणावाआपः पशव आपोन्नमापोमृतमापःसम्राडापोविराडापःस्वराडापश्छन्दास्यापोज्योती ष्यापोयजूष्यापः सत्यमापः सर्वादेवताआपोभूर्भुवःसुवराप आप्ॐ"
ह्या मंत्राने उदक अभिमंत्रण करून
"सूर्यश्च०"
या मंत्राने पूर्वीप्रमाणे मंत्राचमन करावे. नंतर
'दधिक्राव्णो अकारिषे०"
ही ऋचा म्हणून,
'आपोहिष्ठा०"
या तीन ऋचा
"हिरण्यवर्णा०" आणि "पवमानः सुवर्चनः०"
हा अनुवाक या मंत्रानी प्रत्येक ऋचेच्या शेवटी मार्जन याप्रमाणे मार्जन करावे. नंतर अघमर्षण विकल्पाने करून अर्घ्यदानापासून गायत्रीजपापर्यंत आवाहन मंत्रावाचून पूर्वीप्रमाणे करावे. न्यासविधि वैदिक नाही हे पूर्वीच सांगितले आहे. गायत्रीजपानंतर
"मित्रस्यचर्षणी० । मित्रोजनान० । प्रसमित्र० । यच्चिद्धिते० । यत्किंचेदं० । कितवासोयद्रि० ।
या सहा ऋचांना उपस्थान करून
"प्राच्यैदिशेयाश्चदेवताएतस्यांप्रतिवसन्त्येताभ्यश्चनमोनमः"
इत्यादि मंत्रांनी पूर्वादि चार दिशा व ऊर्ध्वा आणि अधरा अशा सहा दिशांना नमस्कार करून
"नमोगङ्गायमुनयोर्मध्ये०"
इत्यादि मंत्राने मुनि, देव यांना नमस्कार करून
"स्रवंतुदिशो०"
हा मंत्र पठन करून गोत्र इत्यादिकांचा उच्चार करून पूर्वीप्रमाणे भूमीला स्पर्शपूर्वक नमस्कार करावा आणि संध्येचे विसर्जन करावे.