आता यानंतर विश्वामित्रगण सांगतो - ते विश्वामित्र दहा-कुशिक, लोहित, रौक्षक, कामकायन, अज, कत, धनंजय, अघमर्षण, पूरण आणि इंद्रकौशिक याप्रमाणे दहा विश्वामित्र आहेत.
१ कुशिक, पर्णजंघ, वारक्य इत्यादिक सत्तरांपेक्षा अधिक कुशिक आहेत. यांचे प्रवर-विश्वामित्र, देवरात, औदल असे तीन भाग आहेत.
२ लोहित, कुडक्य, चाक्रवर्णायन इत्यादि पांचापेक्षा अधिक लोहित आहेत. 'लोइत' या स्थानी 'रोहित' असे कोणी म्हणतात. यांचे प्रवर-वैश्वामित्र, आष्टक, लौहित असे तीन प्रवर आहेत. अथवा अंत्यांचा व्यत्यय करावा. किंवा वैश्वामित्र, माधुच्छंदस, आष्टक असे तीन आहेत अथवा विश्वामित्र, आष्टक असे दोन आहेत. रौक्षक ३ - यांचे प्रवर - विश्वामित्र, गाथिन, रेवण असे तीन आहेत. अथवा विश्वामित्र, रौक्षक, रैवण याप्रमाणे तीन आहेत किंवा हे रेवण जाणावे.
४ कामकायन, देवश्रवस, देवतरस इत्यादिक पांचापर्यंत कामकायन किंवा श्रौमत आहेत. यांचे प्रवर- वैश्वामित्र, देवश्रवस, देवतरस असे तीन आहेत.
५ अज - यांचे प्रवर- वैश्वामित्र, माधुच्छंदस, आज याप्रमाणे तीन आहेत.
६ कत, औदुंबरि, शैशिरी इत्यादिक विसांपेक्षा अधिक कत आहेत. यांचे प्रवर-वैश्वामित्र, कात्य, आक्षील असे तीन आहेत.
७ धनंजय, पार्थिव, बंधुल इत्यादिक सातांपर्यंत धनंजय आहेत. यांचे प्रवर-वैश्वामित्र, माधुच्छंदस, धानंजय याप्रमाणे तीन आहेत. अथवा वैश्वामित्र, माधुच्छंदस, अघमर्षण याप्रमाणे तीन प्रवर आहेत.
८ अघमर्षण. यांचे प्रवर -वैश्वामित्र, अघमर्षण, कौशिक याप्रमाणे तीन प्रवर जाणावे.
९ पूरण यांचे प्रवर - वैश्वामित्र, पूरण याप्रमाणे दोन प्रवर आहेत. अथवा वैश्वामित्र, देवरात, पौरण याप्रमाणे तीन प्रवर आहेत.
१० इंद्रकौशिक. यांचे प्रवर-वैश्वामित्र, इंद्रकौशिक याप्रमाणे दोन प्रवर आहेत. क्वचित ग्रंथामध्ये दुसरेहि अकरा गण सांगितले आहेत. ते असे
१ आश्मरथ्य २ साहुल, ३ गाथिन, ४ वैणय, ५ हिरण्यरेतस, ६ सुवर्णरेतस, ६ सुवर्णरेतस, ७ कपोतरेतस, ८ शालंकायन, ९ घृतकौशिक, १० कथक, ११ रौहिण याप्रमाणे अकरा गण जाणावे. १ आश्मरथ्य - यांचे प्रवर- वैश्वामित्र, आश्मरथ्य, वाधुल याप्रमाने तीन प्रवर आहेत.
२ साहुल यांचे प्रवर - वैश्वामित्र, साहुल, माहुल याप्रमाणे तीन आहेत.
३ गाथिन यांचे प्रावर - वैश्वामित्र, गाथिन, रैणव याप्रमाणे तीच आहेत 'रैणव' ह्या स्थानी 'वेणुव' असा क्वचित ग्रंथी पाठ आहे. ह्यांसच 'रेणव उदवेणव' असेहि म्हणतात.
४ वैणव यांचे प्रवर-वैश्वामित्र, गाथिन, वैणव याप्रमाणे तीन आहेत.
५ हिरण्यरेतस यांचे प्रवर -वैश्वामित्र, हैरण्यरेतस याप्रमाणे दोन आहेत.
६ सुवर्णरेतस यांचे प्रवर - वैश्वामित्र, सौवर्णरेतस याप्रमाणे दोन आहेत.
७ कपोतरेतस यांचे प्रवर - वैश्वामित्र, कपोतरेतस याप्रमाणे दोन आहेत
८ शालंकायन यांचे प्रवर - वैश्वामित्र, शालंकायन, कौशिक याप्रमाणे तीन आहेत. यालाच 'कौशि' 'जन्हव' असेही म्हणतात.
९ घृतकौशिक यांचे प्रवर वैश्वामित्र, घृतकौशिक असे दोन आहेत.
१० कथक यांचे प्रवर - वैश्वामित्र, काथक याप्रमाणे दोन आहेत.
११ रौहिण यांचे प्रवर - वैश्वामित्र, माधुच्छंदस, रौहिण याप्रमाणे तीन आहेत. वैश्वामित्र जे सर्व गण यांचा परस्पर विवाह होत नाही. कारण हे सर्व विश्वामित्रगण एकगोत्री व प्रवरांनी सारखे आहेत. कुशिकांचे व देवरातांचे प्रवर सारखे आहेत. याकरिता कशिक हे देवरातांहून वेगळे किंवा त्यातलेच आहेत याचा निर्णय होत नसल्यामुळे, पुढे सांगावयाचे असे जे देवरात त्यांचा जसा विवाह जामदग्न्यांशी होत नाही, त्याप्रमाणे कुशिकांचाही विवाह जामदन्ग्यांशी होत नाही असे वाटते. धनंजय जे त्यांचा अत्रि व विश्वामित्र यांच्याशी विवाह होत नाही. कत जे त्यांचा विवाह भरद्वाज व विश्वामित्र यांच्याशी होत नाही; कारण कत जे त्याला गोत्रे दोन आहेत. याप्रमाणे विश्वामित्र मित्रगण सांगितला आहे.