लग्नी रवि, चंद्र १।६।८ या स्थानी, मंगळ, ८।१।१० या स्थानी, बुध व गुरु ८ स्थानी शुक्र १।८।६ या स्थानी, शनि व बाकीचे ग्रह लग्नी; लग्नस्वामी ६।८ या स्थानी आणि सर्व ग्रह ७ स्थानी अशुभ होत. 'बाकीचे' म्हणजे राहु व केतु. '१२ वा चंद्र, द्रेष्काणस्वामी व नवमांश स्वामी ६।८ या स्थानी व १० वा बुध हे वर्ज्य करावे असे दुसरे ग्रंथकार सांगतात. नवमांश प्रवृत्ति मेष, सिंह, धन मेषापासून; वृषभ, कन्या, मकर मकरापासून; मिथुन, तुला, कुंभ तुलेपासून कर्क, वृश्चिक, मीन, कर्कापासून; याप्रमाणे तीन तीन वेळ मोजले म्हणजे नवमांश होतात. यामध्ये वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, तूळ, धनु व मीन हे नवमांश शुभ होत.