यांचे सहा प्रकार आहेत १ हरित, २ कुत्स, ३ कण्व, ४ रथीतर, ५ विष्णुवृद्ध आणि ६ मुद्गल.
१. हरित, सौभग, नैय्यगव, इत्यादि बत्तिसांहून अधिक हरित आहेत, त्यांचे आंगिरस, आंबरीष, यौवनाश्च असे तीन अथवा मांधाता आंबरीष, यौवनाश्च असे तीन प्रवर आहेत.
२. कुत्स. यांचे आंगिरस, मांधाता, कौत्स असे तीन प्रवर आहेत.
३. कण्व, औपमर्कट, बाष्कलायन इत्यादि एकवीसांहून अधिक कण्व आहेत. त्यांचे आंगिरस, आजमीढ, कण्व असे तीन अथवा आंगिरस, धौर, काण्व असे तीन प्रवर आहेत.
४. रथीतर, हस्तिद, नैतिरक्षि इत्यादि चवदांहून अधिक रथीतर आहेत. त्यांचे आंगिरस, वैरूप, पार्षदश्व असे तीन प्रवर आहेत. अथवा शेवटच्या दोहोंचा व्यत्यय करावा.
५. विष्णुवृद्ध, शठ, भरण इत्यादि पंचविसांहून अधिक विष्णुवृद्ध आहेत. त्यांचे आंगिरस, पौरुकुत्स्य, त्रासदस्यु असे तीन प्रवर आहेत.
६. मुद्गल, सात्यमुग्रि, हिरण्यस्तंबि इत्यादि अठराहून अधिक मुद्गल आहेत. त्यांचे आंगिरस, भार्म्याश्व, मौद्गल्य असे तीन अथवा तार्क्ष्य, भार्म्याश्व, मौद्गल्य असे तीन प्रवर आहेत. या सहा केवलांगिरसांचा आपला गण खेरीज करून परस्परांमध्ये आणि पूर्वी सांगितलेल्या सर्वांबरोबर विवाह होतो. कारण सप्तर्षि व आठवा अगस्त्य यांहून अंगिरस भिन्न असल्यामुळे त्याच्या अपत्यांचे समान गोत्र होत नाही. आणि दोन अथवा तीन प्रवरांचे साम्य येत नाही. हरित व कुत्स यांचा परस्पर विवाह होत नाही कारण दोन्ही पक्षी दोन प्रवर सारखे येतात.