"श्रिये जात०"
या मंत्राने लक्ष्मीची पूजा,
"इदं विष्णु०"
या मंत्राने विष्णूची पूजा
"गौरीर्मिमाय०"
या मंत्राने गौरीची पूजा,
"त्र्यंबकं०"
या मंत्राने रुद्राची पूजा,
"परंमृत्यो०"
या मंत्राने यमाची पूजा, याप्रमाणे पूजा करून १०८ तिळांचा व घृताचा होम करावा.
"भूःस्वाहा मृत्युर्नश्यतां स्नुषायै सुखं वर्धतां स्वाहा"
या मंत्राने होम करावा. नंतर होमाची समाप्ति करून दोन गोप्रदाने दक्षिणा द्यावी. याप्रमाणे कौस्तुभ ग्रंथात शांति सांगितली आहे ती पहावी. याप्रमाणे प्रतिकूलासंबंधी विचार सांगितला.