"आपोहिष्ठा०"
इत्यादि मंत्रांनी अंगावर प्रोक्षण करणे ते मंत्रस्नान. गायत्रीमंत्राने दहा वेळा उदक अभिमंत्रण करून त्याने सर्वांगावर प्रोक्षण करणे ते गायत्रीस्नान. भस्माने स्नान करणे आग्नेय स्नान. ओल्या वस्त्राने अंग पुसणे ते कपिल स्नान. विष्णूचे चरणतीर्थ, ब्राह्मणाचे चरणतीर्थ यांनी अंगावर प्रोक्षण करणे, विष्णूचे ध्यान. इत्यादि दुसरी अनेक स्नाने आहेत. गौणस्नानांनी जप, संध्या, इत्यादि करण्याविषयी शुद्धि होते; श्राद्ध, देवपूजा याविषयी होत नाही. ब्रह्मयज्ञाविषयी विकल्पेकरून होते