"गायत्र्या विश्वामित्रः सविता गायत्री जपे वि० तत्सवितुर्ह्रदयाय नमः वरेण्यंभर्गोदेवस्यशिखायैवषट् धीमहिकवचायहुम धियोयोनोनेत्रत्रयायवौषट प्रचोदयात अस्त्रायफट"
याप्रमाणे षडंग न्यास करावा. अथवा न्यास करु नये. कारण न्यासविधि वेदामध्ये सांगितला नाही असे गृह्यपरिशिष्टात स्पष्ट सांगितले आहे. याप्रमाणे अक्षरन्यास, पादन्यास, मुद्रादि विधि, शापमोचनादि विधि हे तंत्रकर्मामध्ये सांगितले असल्यामुळे अवैदिक आहेत. करिता हे अनावश्यक आहेत असे जाणावे. नंतर मंत्रदेवतेचे ध्यान करावे. गायत्रीचे ध्यान करावे असे कोणी म्हणतात.
"आगच्छवरदेदेविजपेमेसन्निधौभव । गायन्तंत्रायसेयस्माद्गायत्रीत्वंततःस्मृता॥ "
या मंत्राने गायत्रीचे आवाहन करून
"यो देवः सवितास्माकं धियो धर्मादिगोचरे । प्रेरयेत्तस्य तद्भर्गस्तद्वरेण्यमुपास्महे"
या प्रमाणे मंत्रार्थाचे चिंतन करीत प्रातःकाळी मौनयुक्त सूर्यासन्मुख उभा राहून सूर्यमंडलाचे दर्शन होईपर्यंत प्रणव व्याह्रतिपूर्वक गायत्रीमंत्राचा एकशे आठ, अठ्ठावीस अथवा दहा जप करावा. सायंकाळी वायव्याभिमुख होऊन नक्षत्र दर्शन होईपर्यंत जप करावा. असा विशेष जाणावा. अनध्यायाचे दिवशी अठ्ठावीस आणि प्रदोष दिवशी दहा जप करावा असे कारिकेमध्ये सांगितले आहे. जप करावयाचा तो रुद्राक्ष, पोवळी यांच्या माळेने अथवा अंगुलीच्या पर्वांनी करावा. माळेचे मणि १०८ अथवा ५४ अथवा २७ असावे. जप केल्यानंतर उत्तर न्यास करून उपस्थान करावे. ते असे-
"जातवेदसे० । तच्छंयो० । नमो ब्रह्मण० ।"
या मंत्रांनी प्रातःकाळी व सायंकाळी उपस्थान करावे. असे गृह्यपरिशिष्टाचे मत आहे.
"मित्रस्य चर्षणी०"
इत्यादि सूर्यदेवतेच्या मंत्रांनी प्रातःकाळी आणि
'इमं मे वरुण०"
इत्यादि वरुणाचे पदांनी युक्त अशा मंत्रांनी सायंकाळी याप्रमाणे सूर्योपस्थान करावे असे इतर स्मृति ग्रंथात सांगितले आहे. नंतर
"प्राच्यैदिशेनम इन्द्रायनमः आग्नेय्यैदिशे० अग्नयेनमः"
इत्यादि दहा दिशांना वंदन केल्यावर
"संध्यायैनमःगायत्र्यैनमः सावित्र्यै० सरस्वत्यै० सर्वाभ्योदेवताभ्योनम"
याप्रमाणे वंदन केल्यावर
"उत्तमेशिखरेजातेभूम्यांपर्वतमर्धनि । ब्राह्मणैरभ्यनुज्ञातागच्छदेवियथासुखम"
या मंत्राने संध्येचे विसर्जन करून
"भद्रंनोअपिवातयमनः
असे तीन वेळा उच्चारून प्रदक्षिण फिरत
"आसत्यलोकादापातालादालोकालोकपर्वतात । येसन्तिब्राह्मणादेवास्त्भ्योनित्यंनमोनमः"
या मंत्राने भूमीला स्पर्श करून नमस्कार करावा व दोनदा आचमन करावे.