"सूर्यश्चेतिमन्त्रस्ययाज्ञवल्क्य उपनिषदऋषिः सुर्यमामन्युमन्युपतयोरात्रिश्चदेवताः प्रकृतिश्छन्दः आचमनेविनियोगः सूर्यश्चमामन्युश्चमन्युपतयश्चमन्युकृतेभ्यः । पापेभ्योरक्षन्ताम । यद्रात्र्यापापमकार्षम । मनसावाचाहस्ताभ्याम । पदभ्यामुदेरणशिश्ना । रात्रिस्तदवलुम्पतु । यत्किंचदुरितंमयि । इदमहंमाममृतयोनौ । सुर्येज्योतिषिजुहोमिस्वाहा"
याप्रमाणे मंत्र म्हणून उदक प्राशन करावे. नंतर आचमन करून मार्जन करावे. ते असे
"आपोहिष्ठेतिनवऋचस्याम्बरीषः सिन्धुद्वीप आपोगायत्री पञ्चमीवर्धमाना सप्तमीप्रतिष्ठा । अन्त्येद्वेअनुष्टुभौ मार्जनेविनियोगः"
प्रणवमंत्राने पहिले, व्याह्रतिमंत्रांनी दुसरे, प्रणवान्त गायत्रीमंत्राने तिसरे आणि
"आपो हि ष्ठा०"
या ऋचेने चवथे अशी मार्जने करावी. एक ऋचा, अर्धी ऋचा अथवा ऋचेचा पाद म्हणून मार्जन करावे. अखेरीस गायत्रीशिरोमंत्राने मार्जन करून अघमर्षण करावे. दक्षिण हस्तामध्ये उदक घेऊन "ऋतं च०" या तीन ऋचा अथवा "द्रुपद०" ही ऋचा म्हणून उजव्या नाकपुडीने पापपुरुष उच्छवासरूपाने खाली हातावर टाकून ते उदक न पहाता डाव्या बाजूला जमिनीवर सोडावे. नंतर आचमन करावे. नंतर
"गायत्र्याविश्वामित्रःसवितागायत्री श्रीसूर्यायार्घ्यदानेविनियोगः"
असे म्हणून सूर्यासन्मुख उभे राहून प्रणवव्याह्रतिपूर्वक गायत्रीमंत्राने तीन वेळा उदकांजली सोडावे. संध्येचा कालातिक्रम झाला असेल तर प्रायश्चित्तार्थ चवथे अर्घ्य द्यावे. "असावादित्यो ब्रह्म" या मंत्राने प्रदक्षिण फिरून अर्घ्य द्यावे. अर्घ्यांजली देताना अंगुष्ठ व तर्जनी यांचा उपयोग करू नये. हे अर्घ्यप्रदान कर्म आहे असे कोणी ग्रंथकार म्हणतात; अंगभूत कर्म आहे असे दुसरे ग्रंथकार म्हणतात.