दोन दर्भांची केलेली दोन पवित्रके ग्रंथियुक्त अथवा ग्रंथियुक्त अशी दोन्ही हातामध्ये घालून दोन वेळा आचमन करून प्राणायाम करावा. तो असा
"प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्रीच्छन्दः सप्तानां व्याह्रतीनां विश्वामित्र जमदग्नि भरद्वाज गौतमात्रि वसिष्ठ कश्यपा ऋषयः अग्निवाय्वादित्य बृहस्पति वरुणेंद्रविश्वेदेवा देवताः गायत्र्युष्णिगनुष्टप बृहतीपङ्क्तित्रिष्टुप जगत्यश्छन्दांसि गायत्र्या विश्वामित्रऋषिः सविता देवता गायत्रीच्छन्दः गायत्रीशिरसः प्रजापतिऋषिः ब्रह्माग्नि वाय्वादित्या देवताः यजुश्छ्न्द्रः प्राणायामे विनियोगाः ।"
सर्व अंगुलींनी अथवा तर्जनी आणि मध्यमा वर्ज करून इतर अंगुलींनी नाक धरून दक्षिण नाकपुडीने वायू वर घेऊन धरावा. नंतर
"ओंभूः ओंभुवः औस्वः ओंमहः ओंजनः ओंतपः ओंसत्यम ओंतत्सवितुर्वरेण्यं० यात ओंआपोज्योती रसोमृतंब्रह्मभूर्भुवःसुवरोम "
याप्रमाणे प्रणवपूर्वक सप्त व्याह्रति, गायत्री आणि शिर तीन वेळा म्हणून डाव्या नाकपुडीने वायु खाली सोडावा. याप्रमाणे प्राणायाम करावा. हा प्राणायाम सर्व शाखीयांना साधारण आहे नंतर
"ममोपात्तदुरितक्षयद्वाराश्रिपरमेश्वरप्रीत्यर्थप्रातःसंध्यामुपासिष्ये"
असा संकल्प करावा.
"आपोहिष्ठेति तृचस्याम्बरीषः सिन्धुद्विप आपो गायत्री मार्जने विनियोगः । आपोहिष्ठा०"
ऋचांचे नऊ पादांनी कुशोदकाने मस्तकावर नऊ वेळा मार्जन करावे.
"यस्य क्षयाय०" या मंत्राने अधोभागी मार्जन करावे. नदी इत्यादिकाचे ठिकाणी तीर्थातले उदक अथवा तांब्याचे अगर मृत्तिकेचे पात्र भूमिवर ठेवून त्यातील उदक अथवा डाव्या हातातले उदक दर्भ इत्यादिकाने घेऊन हे सर्व मार्जन करावे. धारेने पडणार्या उदकाने मार्जन करू नये.