१ दुःपंचांगी म्हणजे तिथि, वार, नक्षत्रे, योग, करण ही दुष्ट अर्थात वर्ज्य असणे. २. अष्टमोसृटक - लग्नापासून अष्टम स्थानी मंगळ. ३ सविधुखलतनुः चंद्र व पापग्रह यांनी युक्त असे लग्न. ४ षण्मृतीदुः लग्नापास्न षष्ठ व अष्टम या स्थानी चंद्र. ५ सितौरौ - लग्नापासून षष्ठ स्थानी शुक्र. ६. संक्रांति - सूर्य एका राशीपासून दुसर्या राशीला जातो तो दिवस. ७ गंडदोष - लग्नगंडात, तिथिगंडात व नक्षत्रगंडात असा तीन प्रकारचा गंडांत. ८ सखलभ -दुष्ट ग्रहांनी युक्त असे नक्षत्र. ९. दिनज - वारासंबंधी कुलिक, अर्थयामादिक दोष. १० चक्रचक्रार्धपातौ - वैध्रुतिव्यतीपातसंज्ञक चंद्रसूर्याचे क्रांतिसाम्यलक्षण. ११ रंध्रलग्न - जन्मराशि व जन्मलग्न यापासून अष्टम लग्न १२. कुवर्ग - षड्वर्गामध्ये पाप ग्रहवर्ग अधिक असणे. १३. अस्तगखल - लग्नापासून सप्तमस्थानी पापग्रह असणे. १४ उदयास्ताशुचि - लग्न व अश आपापल्या स्वामींनी युक्त अथवा दृष्ट असणे ही उदयशुद्धि; आणि लग्नापासून सप्तम स्थान व अंश आपापल्या स्वामींनी युक्त अथवा दृष्ट अस्णे ही अस्तशुद्धि; या दोहोंचा अभाव म्हणजे उदयास्ताशुचि १५. क्रूरवेध - क्रुर ग्रहाने विद्ध नक्षत्र. १६ कर्तरि - चंद्रापासून अथवा लग्नापासून २।१२ या स्थानी पापग्रह असणे. १७ एकार्गलांघ्रि - विष्कंभ, अतिगंड, व्याघात, वज्र, व्यतीपात, परिघ, वैधृति, शल व गंड हे नऊ दुष्ट योग असता दिवसनक्षत्रापासून अभिजित्सहित मोजून समनक्षत्री सूर्य असेल तर एकार्गलयोग होतो. एकार्गलाने विद्ध नक्षत्रचरण १८ गृहणभ - ज्या नक्षत्री ग्रहण असेल ते नक्षत्र. १९ कुलव - अनुक्त नवांश. २०. दुःक्षण - दुर्मुहूर्त; शुक्रवारी ९ वा मुहूर्त, सोमवारी ९ वा, गुरुवारी १२ वा, शनिवारी १ ला, हे दिवसास, व मंगळवारी ७ वा रात्रीस हे दुर्मुहूर्त होत. २१ उत्पातभ - भूकंप वगैरे उत्पात ज्या नक्षत्री होईल ते नक्षत्र. असे एकवीस दोष आहेत. यापैकी एकही दोष विवाहाविषयी नसावा.