मंडप तयार करणे इत्यादि विवाहाची अंगभूत कार्ये करावयाची ती अंगी जो विवाह त्याला उक्त अशा नक्षत्राम्वर करावी. 'कांडण, दळण, यवारक, मंडप, मृत्तिकेची वेदी घालणे, घर व भिंती यांना र्म्ग देणे वगैरे विवाहासंबंधीची सर्व कार्ये विवाहाला उक्त अशा नक्षत्री करावी असे वचन आहे. 'यवारक' याला प्राकुतात 'चिकसा' असे म्हणतात. हळद लावणे, उडदामुहूर्त इत्यादिकांना याप्रमाणे चंद्रबल पहाण्याचे कारण नाही. विवाहाची अंगभूत कर्मे विवाहाचे पूर्वी तिसरा, सहावा, नववा या दिवशी करू नयेत. विवाहाचा मंडप तयार करावयाचा तो सोळा, बारा, सहा अथवा आठ हातांचा व चार द्वारांनी युक्त असा करावा. मंडपामध्ये वराचे हाताने चार हात अथवा वधूचे हाताने पाच हात अशी चतुष्कोणी पायर्यांनी युक्त अशी वेदी (बहुले) करावी. ती पूर्वेच्या बाजुस उतरती असून कदली स्तंभादिकांनी सर्वतः सुशोभित अशी गृहातून बाहेर जाण्याचा जो दरवाजा असेल त्याच्या डाव्या बाजूला करावी.